Hesperian Health Guides
कोविड -१९:: तुमचा आजार कोविड -१९ आहे काय?
चाचणी केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला कोणता आजार आहे हे माहित होणे कठीण आहे. व्यक्तीनुसार, कोविड -१९ मध्ये बरेच वेगवेगळी चिन्हे असू शकतात आणि त्यापैकी बरीच चिन्हे इतर आरोग्याच्या समस्येमुळे देखील उद्भवतात. चिन्हे सौम्य, अस्वस्थ करणारे किंवा खूप गंभीर असू शकतात.
धोक्याची चिन्हे आहेत काय: श्वास घेताना त्रास होतो किंवा छातीत तीव्र वेदना? उच्च ताप (१०२F/ ३९C किंवा त्याहून अधिक) आणि तापकरिता चालणारे औषध मदत करत नाही आहेत काय?
|
अशा व्यक्तीस रुग्णालयात/आरोग्य सुविधेत मदतीची आवश्यकता असते. कुठे जायचे आणि काय करावे हे जाणून घेण्यासाठी करोना हेल्पलाईन नंबर वर कॉल करा. जरी काळजी घेणाऱ्या व्यक्तीमध्ये लक्षणे नसले तरीही त्या व्यक्तीची काळजी घेत असलेल्या कोणालाही संसर्ग होऊ शकतो. स्वत:ला आणि इतरांना आजारी पडण्यापासून |
तीव्र ताप, कोरडा खोकला, थकवा किंवा श्वास लागणे आहे काय? ही कोविड -१९ ची सर्व सामान्य चिन्हे आहेत.
|
हे कोरोनाव्हायरस असू शकते किंवा हा दुसरा व्हायरस असू शकतो. उपलब्ध असल्यास, निश्चितपणे जाणून घेण्यासाठी एक चाचणी करून घ्या. आपण घरी उपचार करू शकता. आजार कोणता ही असो, इतरांना आजारी पडण्यापासून वाचवा. जर ती व्यक्ती ५५ वर्षांपेक्षा मोठी असेल तर त्याला हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार किंवा मधुमेह असल्यास गंभीर आजाराचा धोका जास्त असतो. लवकर वैद्यकीय सल्ला घ्या. जर व्यक्ती अधिकच आजारी होत गेली आणि आपत्कालीन लक्षणे दिसू लागली तर त्यांना रुग्णालयात/आरोग्य सुविधेत मदतीची आवश्यकता आहे. इतरांना आजारी पडण्यापासून वाचवा. |
वेदना भरलेले किंवा वाहणारे नाक, घसा खवखवणे, चव घेण्यास किंवा सामान्यपणे गंध घेऊ शकत नाही? ही कोरोनाव्हायरसची चिन्हे आहेत परंतु दुसर्या व्हायरस किंवा आजारामुळे देखील हे असू शकतात. चाचणीशिवाय निश्चितपणे माहित असणे कठीण आहे, परंतु सारखीच काळजी घ्यावयाची आहे.
|
|
ओला खोकला आहे किंवा शिंका येणे आहे काय? जर कोरोनाव्हायरस अद्याप आपल्या भागात नसेल तर ओला खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि ताप या कोरोनायरसपेक्षा सर्दी किंवा फ्लू होण्याची चिन्हे असू शकतात.
| |
काय त्या व्यक्तीस बहुतेकदा एलर्जीची लक्षणे आढळतात (भरलेले किंवा वाहणारे नाक, डोळ्यांना खाज, डोकेदुखी, श्वासोच्छवासाच्या समस्या) आणि ताप नाही? कदाचित हे फक्त त्यांचे नियमित एलर्जीची लक्षणे असू शकतात.
|
हे पृष्ठ सुधारित केले: ०५ जाने. २०२४